Ad will apear here
Next
लष्करात आता महिला जवानही; भरती प्रक्रिया सुरू
आठ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार

नवी दिल्ली : सर्वच क्षेत्रांत उत्तम कामगिरी करून दाखविणाऱ्या महिलांसाठी लष्करी क्षेत्रही अपवाद नव्हते; मात्र अधिकारी पदाखालील पदावर म्हणजे प्रत्यक्ष जवान म्हणून लष्करात आतापर्यंत महिलांना संधी नव्हती. आता मात्र त्या संधीची कवाडे उघडली असून, मिलिटरी पोलिस विभागात महिला जवानांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २५ एप्रिलपासून सुरू झाली असून, त्यासाठीची मुदत आठ जूनपर्यंत आहे. महिलांना मिलिटरी पोलिस विभागात जवान म्हणून कार्य करण्याची संधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जानेवारी २०१९मध्ये जाहीर केला होता. त्यानंतर तीन-चार महिन्यांत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.  

नोंदणी केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार असून, त्यातून निवडलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणीही होणार आहे. या भरती प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या महिलांचा ‘कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस’ या विभागात जवान म्हणून समावेश केला जाणार आहे. या विभागात एकूण २० टक्के जागांवर महिलांची भरती केली जाणार असून, ही भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. दर वर्षी ५२ या हिशेबाने भरती करून महिला जवानांची संख्या ८००पर्यंत नेली जाणार आहे. 

आजवर लष्करात महिलांची नियुक्ती केवळ अधिकारी पदावर केली जात होती. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा अशा विभागांमध्येच महिलांना संधी होती. मात्र आता सशस्त्र दलात जवान म्हणून महिलांची नियुक्ती होणार आहे. निवड झालेल्या महिला जवानांवर निर्वासितांचे व्यवस्थापन, युद्धसदृश परिस्थितीत सीमेलगतच्या नागरिकांच्या स्थलांतराची गरज असल्यास या स्थलांतरात पोलिस प्रशासनाला मदत, नाकाबंदीच्या वेळी महिलांची तपासणी किंवा झडती, चोरी, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचा तपास, युद्धछावण्यांचे व्यवस्थापन, कार्यक्रमप्रसंगी लष्करी शिस्तपालन आणि लष्कराला पोलिसांची मदत आवश्यक असल्यास अशा प्रकारच्या मोहिमांवर जाणे, आदी जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत.

लष्करात महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मिलिटरी पोलिस विभागात महिला जवानांच्या नियुक्तीची कल्पना मांडली होती. संरक्षणमंत्र्यांच्या परवानगीनंतर अवघ्या तीन-चार महिन्यांत त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZJPBZ
Similar Posts
लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे, सरसेनापतिपदी बिपिन रावत रुजू नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ३१ डिसेंबर रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे. मावळते लष्करप्रमुख बिपिन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांची नियुक्ती आता लष्कर, हवाई दल आणि
INDIAN ARMY NATION FIRST हम वीर सम्पूर्ण देश का अभिमान उठाए रहते हैं, हम है जो नाम, नमक, निशान का सम्मान बनाये रखते हैं। Watch this video by PIB
विज्ञानप्रसारासाठी दोन नव्या सरकारी वाहिन्या नवी दिल्ली : आजचे युग विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची विज्ञानाबद्दलची समज वाढविणे आणि नव्या पिढीमध्ये विज्ञानातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे ही आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने विज्ञानाला वाहिलेल्या डीडी सायन्स आणि इंडिया सायन्स या हिंदी भाषेतील दोन वाहिन्या सुरू केल्या आहेत
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language